मुंबई : राज्यात गेले काही दिवस सर्वात कमी तापमान असलेल्या चंद्रपूरला बुधवारी थोडा दिलासा मिळाला. त्याच वेळी मुंबईच्या तापमानात आणखी घट होऊन १५ अंश सेल्सियस एवढी नोंद झाली. तर नाशिकमध्ये सर्वात कमी १०.३ अंश सेल्सियस तापमान होते. पुढील दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सन २०१९चा डिसेंबर महिना अन्य वर्षांतील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत उष्ण ठरला. मात्र वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या तापमानात घट होऊन १६.४ अंश सेल्सियस एवढी नोंद झाली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. सकाळचे तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले.