दरम्यान, या मारहाण प्रकरणानंतर शहापूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नाशिक जिल्ह्यातून मेळाव्यासाठी कुमक
बुधवारी मुंबईच्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना मेळाव्याला नांदगांव विधानसभा मतदार संघातून सुमारे १० ते १२ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली होती. शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानेही बीकेसी मैदानातील मेळावा यशस्वी होण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. नांदगांवहून कार्यकर्ते नेण्यासाठी १०० बस जाणार आहेत. त्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडे १०० बसेसची मागणी केल्याचे कांदे यांनी सांगितले. या शिवाय पदाधिकाऱ्यांची १०० वैयक्तिक वाहनेही मुंबईला नांदगावहून रवाना होणार असल्याचे ते म्हणाले.