बागपत: उत्तर प्रदेशच्या बागपतच्या खेकडा परिसरातील बडागावमध्ये लंकाधिपती रावणाची पूजा केली जाते. त्यामुळे विजयादशमीला देशभरात रावणाच्या पुतळ्याचं दहन होत असताना बडागावमध्ये तसं काहीच होत नाही. इथल्या प्रसिद्ध माँ मंशा देवी मंदिराच्या प्रांगणात रावण कुंड आहे.

बडागावचं नाव लंकाधिपती रावणाशी संबंधित आहे. हिमालयावर तपस्या करून माँ मंशा देवीला प्रसन्न करून रावणानं तिच्याकडे लंकेचा अधीपती होण्याचं वरदान मागितलं. त्यावर देवीनं एक अट ठेवली. मी मूर्ती रुपात तुझ्या खांद्यावर बसून लंकेला येईन. रस्त्यात मूर्तीचा स्पर्श जमिनीला झाल्यास तिथेच माझीच प्राणप्रतिष्ठा होईल, अशी आख्यायिका आहे.
बटण दाबलं, दार उघडलं, पण लिफ्ट आली नाही; ११ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा करुण अंत
बडागावजवळ रावणाला लघुशंका आली. त्यानं एका गुराख्याकडे मूर्ती सांभाळण्यास दिली. हा गुराखी म्हणजे भगवान विष्णू होते. ते गुराख्याच्या रुपात आले होते. रावण लघुशंकेस जाताच त्यांनी मूर्ती खाली ठेवली. रावणानं अनेकदा प्रयत्न केला, मात्र त्याला मूर्ती तिथून उचलता आली नाही. त्यामुळे रावणानं मूर्तीला नमस्कार केला आणि लंकेकडे प्रस्थान केलं. बडागावातील प्राचीन मंदिरात मंशा देवीची मूर्ती आहे.

मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून बडागावचं नाव रावण पडलं. मंशा देवी मंदिर विष्णूंची प्राचीन मूर्तीदेखील आहे. ही आठव्या शतकातील असल्याचं इतिहासकार सांगतात. प्रभू श्रीरामाबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे. पण लंकाधिपती रावणही आमच्या मनात आहे, असं इथले ग्रामस्थ सांगतात. मंशा देवी मंदिराच्या परिसरात रावण कुंड आहे. वर्षानुवर्षांपासून इथे रामलीलादेखील होत नाही.
मोबाईलवर गाणी लावली, पत्नीसोबत ठेका धरला; फ्लॅटमध्ये गरबा खेळता खेळता तरुणाचा मृत्यू
रावणावर श्रद्धा असल्यानं बडागावात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जात नाही. इथल्या मंशा देवी मंदिरात दूरवरून भाविक येतात. रावणामुळेच आपल्या गावात मंशा देवीची प्रतिष्ठापना झाली, असं इथले ग्रामस्थ मानतात. त्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात रावणाबद्दल अपार श्रद्धा आहे. म्हणूनच इथे रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here