मुंबई : शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध कंपन्या वेळोवेळी गुंतवणूकदारांना लाभांश आणि बोनस शेअर्सचा लाभ देतात. ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने त्रैमासिक निकालांचा हंगाम सुरू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपन्या दुसऱ्या तिमाहीचे म्हणजेच जुलै-सप्टेंबर दरम्यानचे तिमाही निकाल सादर करतात. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेली शिवालिक बिमेटल कंट्रोल्स लिमिटेड (Shivalik Bimetal Controls) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जारी करणार आहे. कंपनीने बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

गुंतवणूकदारांना पुन्हा सुगीचे दिवस; ऑक्टोबरमध्ये ५ कंपन्या एक्स-डिव्हिडंड देणार, वाचा सविस्तर
कंपनीकडून बोनस शेअर्सच्या घोषणा
बीएससीच्या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने २:१ बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअर्समागे १ शेअर बोनस म्हणून मिळेल. कंपनीने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड तारीख निश्चित करण्याची घोषणा केली आहे.

दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, ‘ही’ कंपनी एका शेअरवर देणार ५ शेअर्स
याचा अर्थ १३ ऑक्टोबरपर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे किमान २ शेअर असतील, त्यांनाच या बोनस शेअरचा लाभ मिळेल. यामुळे बोनस शेअरमुळे शेअर्सची संख्या साधारणपणे वाढते परंतु मूल्यांकन कमी होते.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी कशी झाली?
एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत ६३० रुपयांवरून ७४० रुपयांपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय जर आपण ६ महिन्यांच्या कामगिरीबद्दल बोललो तर कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत ४५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांना संधी! Paytm चा शेअर घेणार मोठी उसळी; ब्रोकरेज हाऊसने दिले…
हा शेअर देखील एक प्रकारे मल्टीबॅगर ठरला आहे. कारण एका वर्षापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत २७२ रुपये होती जी एका वर्षात ७४० रुपये झाली आहे. म्हणजेच गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरने ७५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here