Maharashtra Politics | शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अनुक्रमे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. साधारण आठ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे हे भाषणासाठी उभे राहतील. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांची भाषणे एकाचवेळी सुरु होण्याची शक्यताही पूर्णपणे नाकारता येत नाही.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट वार
- उद्धव ठाकरे या टीकेला काय प्रत्युत्तर देणार?
शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अनुक्रमे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. साधारण आठ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे हे भाषणासाठी उभे राहतील. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांची भाषणे एकाचवेळी सुरु होण्याची शक्यताही पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे आता दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यात काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापूर्वी रंगली तलवारीची चर्चा
शिंदे गटाकडून आपल्या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या बीकेसी मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी ही ५१ फुटी तलवार ठेवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर येतील तेव्हा त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन होईल. तेव्हा या तलवारीचे पूजन केले जाईल, असे सांगितले जात आहे. याशिवाय, उद्योगमंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यावेळी १२ फुटांची चांदीची तलवार भेट देणार असल्याचेही समजते. या दोन तलवारींची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.