नाशिक : टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या शिवाजीनगर भागात आयोजित दांडिया कार्यक्रमातील वादामुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली. नाशकात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. दांडिया खेळताना लागलेल्या धक्क्याचा वाद कार्यक्रम संपल्यावर उकरुन काढण्यात आला. त्यावेळी बबलू उर्फ कमल लोट याच्या पोटात धारदार चाकू खूपसण्यात आला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, तीन अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये सहभाग आहे.

शहरात नवरात्रोत्सवात आयोजित दांडिया कार्यक्रमात सशस्त्र तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार अंबडमध्ये घडला. तर, जेलरोड भागात एका अल्पवयीन मुलीवरही हल्ला करण्यात आला होता. रविवारी घडलेल्या या घटनांमुळे दांडिया कार्यक्रमांवर तणाव असतानाच मंगळवारी मध्यरात्री तरुणाला किरकोळ कारणातून भोसकण्यात आले. बबलू लोट आणि त्याचा मित्र अनिकेत शिंदे (रा.शिवाजीनगर) हे दांडिया खेळण्यासाठ गेले. तिथे अनिकेतला एका अल्पवयीन मुलाचा धक्का लागला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले.

दम असेल तर समोर या…तुम्हाला बघून घेतो: उदयनराजे भोसले संतापले; पाहा VIDEO
दांडिया संपल्यावर सर्वजण घराकडे जात असताना बबलूने मित्राला धक्का का दिला, यावरुन अल्पवयीन मुलांशी वाद घातला. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. धक्का लागलेल्या मुलाचे इतर साथीदार तिथे आले. त्यापैकी एकाने बबलूच्या पोटात चाकू खुपसला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाल्याने संशयित अल्पवयीन मुलांनी पळ काढला. त्वरित इतरांनी बबलूला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बबलूचा मृत्यू झाला. मित्र अनिकेतच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा संशयितांविरुद्ध दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.

LIVE Eknath Shinde Dasara Melava Live : बीकेसीमध्ये एकनाथ शिंदे काय बोलणार? संपूर्ण राज्याचं लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here