Authored by अमर शैला | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 5, 2022, 7:58 PM
Uddav Thackeray : बीकेसी मैदानावर नागरिकांना बसायला जागा नसल्याने शिंदे यांच्या भाषणापूर्वीच अनेकजण घरी निघाले आहेत. बरेच लोक लांबून आले आहेत, काही लोकं ग्रामीण भागातून आले आहेत. मात्र, मैदानात बसायला जागा नसल्यामुळे अनेकजण नाराज होऊन ते घराकडे परतले आहेत.

हायलाइट्स:
- बीकेसी मैदानावर नागरिकांना बसायला जागा नाही
- शिंदे यांच्या भाषणापूर्वीच अनेकजण घरी निघाले
- बरेच लोकं ग्रामीण भागातून देखील आले आहेत
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे हे शिंदे गटात गेले आहेत. ते म्हणाले की, हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. या ‘एकनाथ’ला ‘एकटा’नाथ होऊ देऊ नका. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही भूमिका मला आवडल्या, असं जयदेव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.