‘आम्ही घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा मिळतोय, मला तर या सभेतील शेवटचा माणूसही दिसत नाही. खरी शिवसेना कुठे आहे, याचं उत्तर या महासागराने सगळ्या हिंदुस्थानाला दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कुठे आहेत, हे सगळ्यांना आता कळालं असेल,’ अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
cm eknath shinde, ‘मी आधीच ठरवलं होतं की….’; शिवाजी पार्कच्या मैदानाबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट – cm eknath shinde big statement regarding the shivaji park ground and shivsena uddhav thackeray in bkc dasara melava
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत घेतलेल्या दसरा मेळाव्यातून हिंदुत्वासह अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. तसंच शिवाजी पार्कच्या मैदानावरून झालेल्या वादंगाबाबत भाष्य करत एक नवा गौप्यस्फोट केला. ‘तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी आधीच ठरवलं होतं की शिवाजी पार्कचं मैदान त्यांना सभेसाठी देण्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिलेला, मैदान आम्हालाही मिळालं असतं, पण मी या राज्याचा मुख्यमंत्री असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मैदान जरी त्यांना मिळालं असलं तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार मात्र आमच्यासोबत आहेत,’ असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.