मुंबई- बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू आहे. शिंदे समर्थकांनी मैदानावर एकच गर्दी केली आहे. आज मुख्यमंत्री आपल्या भाषणात काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना अनेक शिवसैनिकांनी बीकेसीचं मैदान भरून गेलं. यावेळी अनेक मराठी कलाकारही शिंदे यांना समर्थन देण्यासाठी गेले.

एकनाथ शिंदेंनी अर्जुनाची भूमिका बजावली, शरद पोंक्षेंची स्तुतीसुमने

शरद पोंक्षेंनी दिलं समर्थन

एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यासपिठावरून आपलं मनोगत व्यक्त केलं. जे योग्य आहे आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती तेच आता एकनाथ शिंदे करत आहेत असं पोंक्षे म्हणाले. एवढंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांना अर्जुनाची उपमा दिली. सत्य आणि नितीमत्तेसाठी जे जे योग्य आहे ते एकनाथ शिंदे करत आहेत असं शरद यावेळी म्हणाले.

प्रसाद ओक आणि प्रविण तरडे

प्रसाद ओक- प्रविण तरडे यांनीही वाजवल्या टाळ्या

दरम्यान, व्यासपिठावर मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक- लेखक प्रविण तरडे यांनी उभं राहून टाळ्या वाजवत शिंदेंना आपलं समर्थन दिलं. प्रसाद आणि प्रविण दोघांनी आनंद दिघे यांची बायोग्राफी असलेल्या ‘धर्मवीर’ सिनेमात काम केलं. प्रविण यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली. या सिनेमावेळीच दोघांची एकनाथ शिंदेंशी ओळख झाली आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. आता शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याला येऊन प्रसाद आणि प्रविण यांचं समर्थन कोणाला आहे हे न बोलता दाखवून दिलं.

अवधूत गुप्ते शिंदेंच्या दरबारी, बीकेसीतील मेळाव्यात सादर केले शिवसेना गीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here