BKC मध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा चांगले आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! पैसा खर्चून गर्दी आणली, भाषणही लिहून आणले पण वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही हेच BKC मध्ये दिसले, असे ट्विट अतुल लोंढे यांनी केले आहे. तसेच BKC तील दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSS चे प्रवक्ते बनून RSS ने देश कसा घडवला याचे ज्ञान वाटत आहेत. ED च्या भीतीपायी तुम्ही गद्दारी केली त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही पण काहीही बोलून मुख्यमंत्रीपदाची गरिमा घालवू नका. BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा लोटांगण सोहळा सुरु आहे, अशी बोचरी टीका अतुल लोंढे यांनी केली.
एकनाथ शिंदेंचं भाषण सुरु असतानाच लोकांनी धरला घरचा रस्ता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना सभेसाठी जमलेले कार्यकर्ते उठून जात असल्याचा प्रकार बीकेसी मैदानावर पाहायला मिळाला. शिंदे गटाचे मुंबईबाहेरील कार्यकर्ते कालपासून प्रवासात होते. अनेकजण दुपारी मैदानात दाखल झाले आहे. मात्र, सभा सुरु होण्यासाठी रात्रीचे साडेआठ वाचले. तसेच बीकेसी मैदान शिवाजी पार्कच्या तुलनेत लहान असल्याने अनेकांना मैदानाबाहेर उभे राहून भाषण ऐकावे लागत होते. त्यामुळे अनेक लोक एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना अर्ध्यातून निघून गेले.
‘माणसाची हाव किती असते बघा…’
उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेना संपवायची, खतम करायची. माणसाची हाव किती असते बघा. इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिले, आमदार केले, मंत्रीपद दिले आता मुख्यमंत्री झाला, तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचे आहे. लायकी आहे का? आणि तुम्ही स्विकारणार का अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा समाचार घेतला.