कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची पत्नी डोना गांगुली (Dona Ganguly) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री डोना यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.

डोना गांगुली यांना चिकनगुनिया झाला असून कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप, अंग दुखीचा त्रास होत होता. रुग्णालयाच्या एमडी आणि सीईओ डॉ.रुपाली बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोना गांगुली यांना चिकनगुनिया झाला असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डोना यांना हलका आहार दिला जातोय. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष असल्याचे बसू यांनी सांगितले.

वाचा-अजिंक्य रहाणे झाला ‘बाप’माणूस, दसऱ्या दिवशी सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

४६ वर्षीय डोना यांना गेल्या ३-४ दिवसांपासून ताप होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत डोना यांना चिकनगुनिया झाल्याचे समोर आले. डोना यांना रुग्णालयात दाखल केल्यनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांची प्रकृती कशी आहे याची विचारणा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रुग्णालयाने एक प्रेस रिलीज जारी केले आणि प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. डोना या भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुली यांच्या पत्नी असल्या तरी त्या एक प्रसिद्ध डान्सर देखील आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here