MP Krupal Tumane, शिंदेंच्या दसरा मेळाव्यात ते धक्कादायक घडलेच नाही, खासदार कृपाल तुमाणेंचा दावा ठरला फोल – mp kripal tumane claim that two mps and 5 mlas will join the shinde group in the dussehra gathering has failed
मुंबई : आज मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे जंगी दसरा मेळावे पार पडले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे वाकयुद्ध पाहायला मिळाले. दोन्ही गटांनी मोठी गर्दी जमवत आपलीच शिवसेना खरी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान सर्वांचे लक्ष लागले होते ते शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाणे यांच्या दाव्याकडे. मुंबईतील बीकेसी येथे आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यात दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांना धक्का देतील असा दावा खासदार तुमाणे यांनी केला होता. मात्र, आजच्या दसरा मेळाव्यात कोणत्याही खासदार किंवा आमदाराचा प्रवेश होऊ शकला नाही. यामुळे खासदार तुमाणे यांनी केलेला दावा फोल निघाला अशी चर्चा ऐकायला मिळत होती. (mp kripal tumane’s claim failed)
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात सहभागी झाल्यानंतर खासदार तुमाणे यांनी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला होता. दसरा मेळाव्यात दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा त्यांनी छातीठोकपणे दावा केला. हा दावा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे बोलले जात होते. खासदार तुमाणे यांनी दावा केलेल्या खासदारांपैकी एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची?; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले, भाजपवरही घणाघात या दोन खासदारांपैकी एका खासदाराचा मोठा प्रभाव असल्याचे बोलले जात होते. मात्र, ते खासदार नेमके कोण किंवा कोण आमदार शिंदे गटात प्रवेश करणार याचा तपशील मात्र त्यांनी उघड केला नव्हता.
या बरोबरच येणाऱ्या पुढील काळात आणखी १० ते १२ आमदार शिंदे गटात येतील, असाही खासदार तुमाणे यांचा दावा आहे. या बरोबरच लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत १६ खासदार शिंदे गटात आलेले दिसतील, असाही दावा तुमाणे यांनी केला आहे. तुमाणे यांनी केलेल्या दाव्यानंतर गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.