नवी दिल्ली : भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्सने बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपबाबत जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी अलर्ट जारी केला आहे. द गॅम्बियामध्ये ६६ लोकांच्या मृत्यूनंतर हा अलर्ट जारी करण्यात आला. डब्ल्यूएचओने त्यांच्या वैद्यकीय उत्पादन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेच्या चाचण्यांदरम्यान, मेडेन फार्मास्युटिकल्सच्या खोकला आणि सर्दी सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची जास्त मात्रा आढळली, जे धोकादायक आहे.

यासोबतच डब्ल्यूएचओने अहवालात या उत्पादनाबाबत लोकांना अलर्ट जारी केली आहे. गांबियामध्ये आतापर्यंत वादग्रस्त उत्पादने आढळून आली आहेत. आता ते इतर देशांमध्ये देखील वितरित केले जाऊ शकते. माहितीनुसार, त्याच्या तपासणीसाठी चार उत्पादनांचे नमुने तपासण्यात आले.

टिटवाळा स्थानकात प्रवाशाकडे सापडलं भलं मोठं घबाड, बॅग उघडताच पोलिसांना फुटला घाम
चार उत्पादनांमध्ये भारतातील उत्पादनांचा समावेश…

यामध्ये, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले की, ज्या चार उत्पादनांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली त्यात मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड ऑफ इंडियाने बनवलेले खोकला आणि कोल्ड सिरपचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रूग्णांचे आणखी नुकसान टाळण्यासाठी सर्व देशांमध्ये अशी उत्पादने शोधून काढून टाकण्याची शिफारस केली आहे.

गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये गॅम्बियामध्ये ६० मुलांचा मृत्यू झाला होता. या मुलांनी खोकल्याचे सिरप प्यायले होते, त्यामुळे या मुलांच्या किडनीची धोका निर्माण झाला. यानंतर आता सरकार या मृत्यूंमागील कारणांचा शोध घेत आहे.

दुर्गा विसर्जनावेळी धक्कादायक घटना, नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून मोठा अनर्थ, ८ जण दगावले

याआधी डब्ल्यूएचओने कोविड उपचारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. कोविड उपचारात सोट्रोविमाब आणि कॅसिरिविमाब-इमडेविमाब नावाची दोन अँटी-बॉडी औषधे वापरली जाऊ शकत नाहीत, असे या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. नुकत्याच पसरलेल्या करोनाच्या प्रकारावर ही दोन्ही औषधे फायद्याची नाहीत, असे मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या गाईडलाइन डेव्हलपमेंट ग्रुप ऑफ इंटरनॅशनलच्या तज्ज्ञांनी यावर पुन्हा तपासणी केली आणि या तपासणीचे निकाल बीएमजेमध्ये प्रकाशित झाले, ज्यामध्ये या दोन्ही औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here