Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 6, 2022, 7:32 AM

परदेशातील पार्सलद्वारे अमली पदार्थ तस्करीची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. या तस्करीची गुप्त माहिती डीआरआयला अमेरिकेतून मिळाली होती.

 

mumbai-airport
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः परदेशातील पार्सलद्वारे अमली पदार्थ तस्करीची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. या तस्करीची गुप्त माहिती डीआरआयला अमेरिकेतून मिळाली होती.

डीआरआय मुंबईने मंगळवारी रात्री साडेतीन किलो वजनाचा एक अमली पदार्थ केक जप्त केला. याबाबतची माहिती डीआरआयला अमेरिकेतील एका कुरिअर कंपनीकडून मिळाली होती. एका खाद्यान्नाच्या खोक्यात हा माल लपविण्यात आला होता. हा माल मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात लपविण्यात आला होता. तेथून तो हैदराबादला जाणार होता. त्याआधी दिल्लीत बदलला जाणार होता. त्यानुसार डीआरआयच्या तपास पथकाने आणखी माग काढत दोघांना अटक केली. त्यापैकी एक जण हैदराबाद येथील असून तोच खरा या तस्करीचा म्होरक्या आहे. त्याने या तस्करीची परदेशात मागणी करण्यासाठी ‘डार्क वेब’ यंत्रणेचा वापर केला. तर पैशांचा व्यवहार क्रिप्टो चलनात केला होता.

डीआरआयने आणखी माहिती काढली असता अशी एकूण ५.३० किलोची तस्करी करण्यात आली होती व त्याचे बाजारी मूल्य २.३६ कोटी रुपये होते. ही सर्व गांजाच्या केकची तस्करी होती, असे डीआरआयच्या तपासात समोर आले असून आणखी जोमाने तपास सुरू आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here