Mumbai Shivaji Park Shivsena Dasara Melava : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) बोचरी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर दिलं. अशातच दोन्ही दसरा मेळाव्यांना (Dasara Melava 2022) अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai News) कडेकोट बंदोबस्त तैनात होता. तरिही शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) ठाकरेंच्या शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मात्र दादर (Dadar) परिसरात भाजपचे पोस्टर्स (BJP Posters) फाडण्यात आले. याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत. 

मुंबईत दादरमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर या भागात भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा संपल्यानंतर पोस्टर फाडण्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. पोस्टर्स कुणी फाडले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. ज्या ठिकाणी ठाकरेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, त्या शिवाजी पार्कपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. शिवाजी पार्कपासून अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हे पोस्टर्स फाडले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली असून उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक असे दोन गट दिसून येत आहेत. दोन्ही गटांमध्ये सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहोत. अशातच काल दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. पक्षातील बंडानंतरचा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. दोन्ही मेळाव्यांना अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here