सौरव कटियारच्या काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईकांची मुलं आली होती. त्यात अनुष्का, तनू, मनू, अंशिका, अभय आणि सौरभ यांचा समावेश होता. मंगळवारी दुपारी गंगा नदी पात्रात उभे राहून सगळ्यांनी एक फोटो काढला. त्यांचा फोटो गौरीनं काढला होता.
फोटो काढत असताना अंशिका बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकापाठोपाठ एक उड्या घेतल्या. मात्र सगळेच बुडाले. बुडालेले सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. मुलं बुडाल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. संध्याकाळी एसडीआरएफचं पथक पोहोचलं. तेव्हापर्यंत केवळ सौरभचा मृतदेह हाती लागला होता. इतरांच्या शोधासाठी बुधवारी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं.
बिल्होर घाटासोबतच इतर घाटांवरही मुलांचा शोध घेण्यात आला. पाण्याचा वेग जास्त असल्यानं मुलं दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसडीआरएफ, पोलीस आणि पाणबुड्यांनी मुलांचा शोध सुरू ठेवला. एकाचवेळी ६ मुलं बुडाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ माजली.