Maharashtra Politics | शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, असे वक्तव्य खासदार कृपाल तुमाने यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. पुढील काळात आणखी १० ते १२ आमदार शिंदे गटात येतील. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत १६ खासदार शिंदे गटात आलेले दिसतील, असे त्यांनी म्हटले होते. काल दिवसभर या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती.

हायलाइट्स:
- उरलेल्या मोजक्या खासदारांपैकी आणखी तीन खासदारही शिंदेंच्या गोटात जाणार
- शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली होती
कृपाल तुमाने नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, असे वक्तव्य खासदार कृपाल तुमाने यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. पुढील काळात आणखी १० ते १२ आमदार शिंदे गटात येतील. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत १६ खासदार शिंदे गटात आलेले दिसतील, असे त्यांनी म्हटले होते. काल दिवसभर या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती. ठाकरेंची साथ सोडून कोणते आमदार आणि खासदार शिंदे गटात जाणार, याविषयी बरेच तर्कवितर्क लढवण्यात आले. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील असाच काहीसा दावा केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यात शिवसेनेतील अनेक बड्या नेत्यांचे प्रवेश होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आमदार आणि खासदार सोडाच पण बीकेसीच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या साध्या पदाधिकाऱ्याचाही शिंदे गटात पक्षप्रवेश झाला नाही.
जुने-नवे कार्यकर्ते भगव्याखाली एकवटले
शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर कितपत गर्दी जमेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. एकाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत असल्याने शिवसैनिकांच्या मनात दुही निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, तरीही या दुहीला बाजूला सारत अनेक जुन्या-नव्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर जत्थ्या जत्थ्यांनी उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी दुपारी १२ वाजल्यापासूनच शिवाजी पार्कवर यायला सुरुवात केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.