मेक्सिको : अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनांचा परिणाम आता शेजारील देशांमध्येही दिसून येत आहे. अमेरिकेच्या शेजारील देश मेक्सिकोमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. मेक्सिको सिटी हॉलमध्ये बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात महापौरांसह १८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारी अचानक बंदुकधारी गुरेरो राज्यातील सॅन मिगुएल टोटोलापनच्या सिटी हॉलमध्ये पोहोचला आणि त्याने लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील आणि माजी महापौर जुआन मेंडोझा तसेच सात पोलिसांचा समावेश आहे.

भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीने ६६ मुलांचा जीव घेतला? WHO कडून मेडिकल अलर्ट जारी
पोलिसांनी खबरदारी घेत हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचे काही फोटोही समोर आले असून, त्यात सिटी हॉलच्या भिंतींवर गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. सभागृहाच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत.

खरंतर, अमेरिकेत गोळीबाराच्या घटना रोजच समोर येत आहेत. आता मेक्सिकोतही अशा घटना घडू लागल्या आहेत. मेक्सिकोमधील घटना बहुतेक गोळीबार किंवा अंमली पदार्थांच्या तस्करांमधील टोळीयुद्धांशी संबंधित आहेत.

टिटवाळा स्थानकात प्रवाशाकडे सापडलं भलं मोठं घबाड, बॅग उघडताच पोलिसांना फुटला घाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here