led tv exploded: दिल्लीपासून जवळ असलेल्या गाझियाबादमधील हर्ष विहारमध्ये एका घरात टीव्हीचा स्फोट झाला. टीव्ही फुटल्यानं १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या स्फोटात तरुणाची आई, वहिनी आणि मित्र जखमी झाला. खोलीच्या भिंतींना स्फोटामुळे तडे गेले.

टीव्हीचा स्फोट झाल्यानंतर स्क्रीनचे तुकडे ओमेंद्रच्या चेहऱ्यावर घुसले. एकूण चार जण जखमी झाले होते. त्यात दोन महिला आणि दोन तरुणांचा समावेश होतो. पैकी एका तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती गाझियाबादच्या टीला मोड ठाण्याचे प्रभारी भुवनेश कुमार यांनी दिली.
टीव्हीचा स्फोट झाला त्यावेळी घरात कुटुंबातील अन्य सदस्यही होते. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यामुळे संपूर्ण घर हादरल्याचं कुटुंबातील सदस्य असलेल्या मोनिकानं सांगितलं. स्फोट झाला तेव्हा मोनिका दुसऱ्या खोलीत होती. स्फोटामुळे अनेक भिंतींना तडे गेले. भिंतींचे काही भाग पडले. स्फोटाचा आवाज आणि त्यामुळे झालेलं नुकसान पाहता सिलिंडर फुटला असावा अशी शंका आम्हाला आली. स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही सारे बाहेर आलो. तेव्हा घरातून धूर निघत होता, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.