Maharashtra Politics | यापूर्वी शिंदे गटातील काही खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांमधून पुढे काहीच निष्पन्न झाले नव्हते. परंतु, आता केंद्रात शिंदे गटाला छोटी का होईना पण एखादी जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आता आगामी काळातही मोदी सरकारकडून शिंदे गटाला अशा लहानसहान जबाबदाऱ्या देऊन केंद्रात अधिक प्रतिनिधित्व दिले जाणार का, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- प्रतापराव जाधव यांची केंद्रातील माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी
- शिंदे गटाला पहिल्यांदाच केंद्रात अधिकृतरित्या प्रतिनिधित्व मिळाले आहे
दरम्यान, यानिमित्ताने पुन्हा एकदा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रतापराव जाधव यांनी मातोश्रीवर गंभीर आरोप केले होते. कुठे आहे तो वाझे.. कुठे आहे अनिल देशमुख… यांच्याकडून ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके जायचे, असे वक्तव्य जाधव यांनी केले होते. त्यावरुन बराच वादंग झाला होता. त्यानंत प्रतापराव जाधव यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले होते. मातोश्रीवर १०० खोके जायचे असं मला म्हणायचं नव्हतं, असे सांगत त्यांनी सारवासारव केली होती.
शिंदेंना पाठिंबा देण्यात आघाडीवर असलेल्या प्रतापराव जाधवांना मोठी जबाबदारी
शिवसेना पक्षात ऐतिहासिक फूट पडल्यानंतर ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १८ पैकी १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. त्यामध्ये बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव अग्रणी होते.
अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि मातोश्रीसाठी कायपण असं बोलणारे हे तेच लोकप्रतिनिधी-सेना नेते आहेत का? असा प्रश्न पडावा, एवढी टीका सध्या बंडखोर नेते ठाकरेंवर करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.