मुंबई : शेअर बाजाराची जोरदार सुरुवात होण्याची चिन्हे प्री-ओपनमधूनच मिळाली. बाजाराच्या सुरुवातीला मिडकॅप्समध्येही चांगली वाढ दिसून येत आहे आणि बँक निफ्टीही तेजीत दिसत आहेत. दसऱ्याच्या सुट्टीनंतर आज बाजारात तेजी सुरू झाली आहे. बँक निफ्टीने सुमारे ४०० अंकांच्या उसळीने सुरुवात केली आहे.

बोनस शेअर्समधून कमाईची संधी! ‘ही’ कंपनी दोन शेअर्सवर देणार १ बोनस शेअर
बाजाराची सुरुवाती कशी झाली
अमेरिकन बाजार सपाट बंद आणि SGX निफ्टी व डाऊ फ्युचर्समध्ये झालेली वाढ याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. विजय दशमीच्या सुट्टीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या चिन्हांसह व्यवहार करू केले. आज बाजारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स २४८.५८ अंकांच्या म्हणजेच ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह ५८,३१४ वर उघडला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टीने १०४.९५ अंकांच्या किंवा ०.६१ टक्क्यांच्या वाढीसह १७,३७९ वर व्यापाराला सुरुवात केली.

क्षेत्रीय निर्देशांकाचे चित्र
आज आर्थिक समभागांमध्ये थोडीशी विक्री झाली आहे, तरी ती हिरव्या चिन्हात राहिली आहे. आज FMCG लाल चिन्हात दिसत आहे आणि इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगाच्या तेजीच्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तसेच मीडिया शेअर्समध्ये सर्वाधिक १.९० टक्के ताकद दिसून येत असून त्यात आयटी, पीएसयू बँका, रिअल्टी आणि तेल आणि वायू क्षेत्र आघाडीवर राहिले.

गुंतवणूकदारांची चांदी! गेल्या वर्षभरात छप्परफाड परतावा देणारे मल्टीबॅगर्स, तुमच्याकडे आहेत का?
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती
आज ३० पैकी ७ समभागांमध्ये सेन्सेक्समध्ये घसरण होताना दिसत आहे आणि २३ समभाग उसळीसह व्यवसाय होताना दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या ५० पैकी ४६ समभागांमध्ये वाढ आणि ४4 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होणार, अब्जाधीशांना फटका बसणार
कोणते शेअर्स पडले, कोणी उसळी घेतली
आजच्या चढत्या समभागांवर नजर टाकली तर HCL टेक, L&T, टाटा स्टील, इन्फोसिस, NTPC, सन फार्मा, टेक महिंद्रा, एसबीआय, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सेन्सेक्स सर्वात जास्त वाढले आहेत. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी, एचयूएल आणि बजाज फायनान्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

अमेरिकन बाजार सपाट बंद
दुसरीकडे, SGX निफ्टी १०० अंकांच्या उसळीसह १७,४०० च्या वर आहे तर, डाऊ फ्युचर्समध्ये १५० अंकांची मजबूती दिसून आली. बुधवारी अमेरिकन बाजार सपाट बंद झाले. डाऊ जोन्स ४२ अंकांनी ३०२७४ अंकांवर तर नॅस्डॅक २८ अंकांनी घसरून १११४९ वर बंद झाला. S&P 500 ०.२० टक्क्यांनी घसरला. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत डाऊ ८०० अंकांनी तर नॅस्डॅक ३५० अंकांनी वधारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here