इंदूर: आईच्या कुशीत बसून गरबा पाहणाऱ्या मुलीचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या हिरा नगर परिसरात मंगळवारी ही घटना घडली. गरबा पाहत असताना मुलीला अचानक बंदुकीची गोळी लागली. तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. ही गोळी नेमकी कुठून आली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बंदुकीची गोळी लागल्यानं मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ऑटॉप्सी अहवालाची वाट पाहत आहेत.

मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास गौरी नगरात ही घटना घडली. मा शारदा नगरची रहिवासी असणारी माही शिंदे आईसोबत गरबा पाहण्यास गेली होती. त्यावेळी तिचा लहान भाऊदेखील सोबत होता. माही आई रक्षा शिंदेंच्या मांडीवर बसली होती. त्यावेळी तिचा भाऊ शेजारी बसला होता. तिघे गरबा पाहत होते. त्यावेळी अचानक माहीच्या डोक्याला जखम झाली. रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली.
एलईडी टीव्ही बॉम्बसारखा फुटला; तरुणाचा मृत्यू, ३ जखमी; भिंतीला मोठं भगदाड, अख्खं घर हादरलं
माही अचानक बेशुद्ध पडल्यानं तिची आई घाबरली. रडत रडत तिनं आसपासच्या लोकांकडे मदत मागितली. लोकांनी माहीला लगेच रुग्णालयात नेलं. तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरूच होता. बरेच तास रक्तस्राव थांबला नाही. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास माहीनं उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

शेजारच्या इमारतीमधून गोळीबार झाला असावा आणि ती गोळी माहीला लागली असावी, असा प्राथमिक अंदाज हिरा नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप पुरी यांनी वर्तवला. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आम्ही वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत आहोत, अशी माहिती पुरी यांनी दिली.
‘तो’ फोटो अखेरचा ठरला! एकीला वाचवण्यासाठी ६ जणांच्या एकापाठोपाठ उड्या; सगळे बुडाले
माहीचे वडील संतोष शिंदे शारदा नगरात किराणा मालाचं दुकान चालवतात. मंगळवारी नवरात्रीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे माहीनं आईकडे गरबा पाहण्यासाठी नेण्याचा हट्ट धरला. त्यामुळे आई माहीला घेऊन गरबा पाहण्यासाठी घेऊन गेली. गरबा पाहत असताना माहीच्या आईनं गोळीबाराचा आवाज ऐकला. शिंदे कुटुंब मूळचं महाराष्ट्राचं आहे. गेल्या काही वर्षांपासून ते इंदूरमध्ये वास्तव्यास आहे.

डॉ. पी. एस. ठाकूर आणि डॉ. जगदिश तोमर यांनी माहीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. पोलीस अधिकारी आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी माहीच्या डोक्याला लागली. हा गोळीबार कशासाठी करण्यात आला, ती गोळी कोणी झाडली होती याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here