उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका व्यक्तीनं आपल्या मेहुण्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. स्वत:ला राम म्हणवून घेत त्यानं आपल्या मेहुण्यांची तुलना रावण, कुंभकर्ण आणि बिभीषणाशी केली. ज्याप्रकारे रामानं रावणाचा वध केला होता, त्याचप्रमाणे मी माझ्या मेहुण्यांना मारणार असल्याचं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

विजयादशमीच्या दिवशी दिनेशनं तिन्ही मेहुण्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रावण श्रीरामाची पत्नी माता सीतेला उचलून घेऊन गेला. त्यानंतर रामानं रावणाचा वध केला. त्याचप्रकारे मी माझ्या तिन्ही मेहुण्यांना बंदुकीनं मारुन टाकेन, अशी फेसबुक पोस्ट दिनेशनं केली. दिनेशनं त्याच्या तिन्ही मेहुण्यांचा फोटो पोस्टमध्ये वापरला होता.
दिनेशनं दिलेली धमकी पाहून तिन्ही मेहुण्यांनी दिनेशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिनेशनं आपल्याला व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवूनही धमकी दिल्याचा दावा त्याचा मेहुणा विनोदनं केला. त्यानं फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सऍप मेसेजचा स्क्रीनशॉट पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.