विक्रीविना घरे
– एप्रिल ते जून या तिमाहीत ७,६३,६५० घरे विक्रीविना पडून होती
– जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत त्यात वाढ होऊन ७,८५,२६० घरे विक्रीविना झाली आहेत
– दिल्ली राजधानी परिसर (दिल्ली, गुरूग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद) येथे सर्वाधिक घरे पडून
– विकल्या न गेलेल्या घरांची संख्या मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआर (मुंबई, माझगाव, पनवेल, डोंबिवली, ठाणे पश्चिम, बोईसर) येथेही अधिक
– अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता व पुणे येथेही अनेक घरे पडून
दिल्लीतील स्थिती
– दिल्ली राजधानी परिसराला विक्रीविना घरांचा सर्वाधिक फटका
– दिल्ली परिसरात आम्रपाली, जयपी इन्फ्राटेक, युनिटेक यांसारख्या बांधकाम कंपन्यांतील गैरव्यवहारामुळे घरविक्री थांबली
– दिल्ली भागात एक लाख घरे पडून आहेत
– या घरांची विक्री पूर्ण होण्यासाठी लागणार ६२ महिने
घरांची स्थिती
– गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात ५५ हजार ९१० घरांची विक्री झाली
– यंदा याच काळात ८३ हजार २२० घरे विकली गेली
– २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत शिल्लक घरांची विक्री होण्यासाठी ४४ महिने लागतील असा अंदाज व्यक्त झाला होता
– यावर्षी घरांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे शिल्लक घरांच्या विक्रीसाठी ३२ महिने लागणार आहेत
– आठ शहरांमध्ये विक्रीविना पडून असलेल्या घरांमध्ये २१ टक्के घरे पूर्णतः तयार आहेत
– घरांची विक्री होण्यासाठी अर्थव्यवस्था आणखी गतिमान होण्याची गरज आहे
सप्टेंबर अखेर घरविक्री
शहर विक्रीविना घरे विकण्यासाठी अपेक्षित कालावधी
मुंबई महानगर प्रदेश २,७२,९६० ३३ महिने
पुणे १,१५,३१० २२ महिने
दिल्ली एनसीआर १,००,७७० ६२ महिने
हैदराबाद ९९,०९० ४१ महिने
बेंगळुरू ७७,२६० २८ महिने
अहमदाबाद ६५,१६० ३० महिने
चेन्नई ३२,१८० २७ महिने
कोलकाता २२,५३० २४ महिने