कॅलिफॉर्निया: अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधून अपहरण झालेल्या एकाच पंजाबी कुटुंबातील चार सदस्यांचं मृतदेह सापडले आहेत. यामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. पंजाबी कुटुंब वास्तव्यास असलेल्या परिसरातच त्यांचे मृतदेह आढळून आले.

३ ऑक्टोबरला दक्षिण हायवे क्रमांक ५९ वरून चौघांचं जबरदस्तीनं अपहरण करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी कोणत्याही संशयिताचं नाव सांगितलं नाही. पीडित कुटुंबाचा अमेरिकेत वाहतूक व्यवसाय होता. हे कुटुंब मूळचं पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील टांडामधील हरसी गावचं होतं.
गरबा पाहायला गेली, आईच्या मांडीवर बसली; डोक्यातून अचानक रक्तस्राव, मुलीचा रहस्यमय मृत्यू
कुटुंबातील चौघांचे मृतदेह एका बागेत सापडले. राज्याचे शेरिफ वर्न वार्नके यांनी ही माहिती दिली. आम्हाला ज्याची भीती होती, नेमकं तेच घडलं, असं वार्नके म्हणाले. मृतांमध्ये ८ महिन्यांची आरुही धेरी, तिची आई जसलीन कौर (२७), वडील जसदीप सिंग (३६), जसदीप यांचा भाऊ अमनदीप सिंग (३९) यांचा समावेश आहे. एका लुटारून कुटुंबाचं अपहरण केलं. एक दिवसानंतर त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आधी पोलिसांकडून देण्यात आली होती.

अपहरणकर्त्यानं पैशांची मागणी केली नव्हती. त्यामुळे कुटुंबाचं अपहरण पैशांसाठी झालं नसावं अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. अपहरणानंतर पोलिसांनी एका व्यक्तीचे दोन फोटो प्रसिद्ध केले होते. संशयिताची माहिती पोलिसांकडून जारी करण्यात आली होती. त्याचं वर्णन प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
‘तो’ फोटो अखेरचा ठरला! एकीला वाचवण्यासाठी ६ जणांच्या एकापाठोपाठ उड्या; सगळे बुडाले
सिंग कुटुंब मूळचं पंजाबच्या होशियारपूरचं होतं. सोमवारी त्यांचं अपहरण झालं. त्यांची कार रस्त्याच्या कडेला जळालेल्या स्थितीत सापडली. अपहरणानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संशयितानं कुटुंबाच्या एटीएम कार्डचा वापर केला होता. बंदुकीच्या धाकानं कुटुंबाचं अहरण करण्यात आलं असावं अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here