परभणी : दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळ प्रशासनाकडून १७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये ज्यादा वाहतूक केली जाणार आहे. यादरम्यान नियतनाची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता मार्गावर असताना गाडीमध्ये बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.

जादा वाहतूक करताना एसटी महामंडळाची मालकीची असलेली वाहने विशेषतः शिवनेरी आणि शिवशाही बस रस्त्यावर राहतील. मार्ग बंद राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी आतून व बाहेर धुतली जाईल याची दक्षता घेतली जाणार आहे. गाडीतील सर्व आसणे सुस्थितीत असल्याशिवाय गाडी रस्त्यावर चालवली जाणार नाही. गाड्यांच्या खिडक्या सुस्थितीत असतील याची खबरदारी घेतली जाणार आहे.

Weather Alert Maharashtra : राज्यात पुणे वगळता ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा
गाडी रस्त्यामध्ये पंक्चर झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गाडीला स्पेअर टायर, व्हेईकल टूल दिला जाणार आहे. गाडीचे पुढचे व मागचे टायर सुस्थितीत असतील याची खबरदारी घेतली जाणार आहे. गाडी सेल्फ स्टार्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. गाडीचे वायफर आणि सर्व लाईट सुरु असतील याची खात्री करावी. गाडीचे हॉर्न सुरू आहे की नाही याची खात्री करावी, मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाडीमध्ये अग्निप्रतिबंधक उपकन, प्राथमिक उपचार पेटी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सिटी हॉलमध्ये अज्ञाताकडून गोळीबार; महापौर, पोलिसांसह तब्बल १८ जणांचा जागीच मृत्यू
मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाडीचा आतील व बाहेरील रंग सुस्थितीत आहे का याची खात्री केली जाणार आहे. ज्या गाड्यांचे रंग सुस्थितीत नाहीत अशा गाड्या मार्गावर चालू नये अशा सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना एसटी महामंडळ प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. त्यामुळे दिवाळीत ज्यादा वाहतुकी दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीने ६६ मुलांचा जीव घेतला? WHO कडून मेडिकल अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here