Authored by Priyanka Vartak | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 6, 2022, 12:34 PM

RBI repo rate hike effect: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय रिझर्व्ह बँकेने सणवारापूर्वी बँक ग्राहकांना झटका देत रेपो दरात यंदा चौथ्यांदा दरवाढ केली. यामुळे सर्वप्रकारची कर्जे घेणे महाग झालेच तर आधीपासूनच कर्जे घेतलेल्या ग्राहकांचा EMI वाढला. आरबीआयने दरवाढ केल्यावर सध्या रेपो दर ५.९० बेसिस पॉईंट आहे.

 

Banks Interest rate Hike
कोणत्या बँकांनी किती व्याजदर वाढवले

हायलाइट्स:

  • आरबीआयकडून यावर्षी चौथ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली
  • आरबीआयचा रेपो दर सध्या ५.९० आहे
  • मध्यवर्ती बँकेनंतर अन्य बँकांनीही आठवडाभरात आपल्या कर्जदारात भरमसाठ वाढ केली
नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँकेने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ३० सप्टेंबर २०२२ रोजी यंदा वर्षातून चौथ्यांदा दरवाढ करत कर्ज घेतलेल्या किंवा घेऊ इच्छित असणाऱ्यांना ‘जोर का झटका’ दिला. आरबीआयने यापूर्वी तीनदा आपल्या मुख्य व्याजदरात वाढ केली. यानंतर मध्यवर्ती बँकेच्या पावलावर पाऊल टाकत बँकांनीही कर्जदारात वाढ केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! सरकारकडून GPF व्याजदरांची घोषणा; जाणून घ्या किती होणार फायदा
१० बँकांची कर्जे महागली
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर एका आठवड्यात सुमारे १० बँकांनी कर्जे महाग केली आहेत. मात्र मोजक्याच बँकांनी ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे. तेही कर्जापेक्षा खूपच कमी आहे. बहुतांश बँकांनी कर्ज ०.५० टक्क्यांनी महाग केले आहे. आरबीआयने ३० सप्टेंबर रोजी रेपो दरात अर्ध्या टक्क्याने म्हणजेच ०.५०% वाढ केली होती. त्यानंतर एकाच दिवशी तीन बँकांनी कर्ज महाग केले. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हप्त्यात १.९०% वाढ झाली आहे. यापूर्वी कर्जावरील व्याज ६.५% होते, जे आता ८% च्या वर पोहोचले आहे. दुसरीकडे तेव्हा मुदत ठेवी (FD) वर ५ ते ६ टक्के व्याज होते, जे अजूनही ६ ते ७% दरम्यान आहे. अशा परिस्थितीत कर्ज सुमारे २% महाग झाले असताना मुदत ठेवींवरील व्याज केवळ १ टक्क्याने वाढले आहे.

HDFC, आयसीआयसीआय कर्ज ०.५०% महाग

  • HDFC लिमिटेडने ३० सप्टेंबर रोजी कर्ज ०.५०% ने महाग केले आणि १ ऑक्टोबरपासून ते लागू झाले. त्याचा रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) १७.९५% आहे.
  • गृहकर्जाचा किमान व्याजदर ८.६० टक्के आहे. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचा दर ०.५० टक्क्यांनी वधारला. त्याचा बाह्य बेंचमार्क कर्ज दर (EBLR) ९.२५ टक्के आहे.

SBI ग्राहकांना पुन्हा झटका! ३० लाखांच्या गृहकर्जासाठी आता किती हप्ता भरावा लागणार, समजून घ्या
एसबीआयचे EBLR ८.५५%

  • भारतीय स्टेट बँकेने EBLR अर्ध्या टक्क्यांनी वाढवला. त्याचा EBLR आता ८.५५ टक्के आहे.
  • सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) देखील RLLR मध्ये ०.५०% वाढ केली, ज्यामुळे तो आता ७.७० पासून ८.४० टक्क्यांच्या दरम्यान पोहोचला आहे. मात्र, त्यांचा मूळ दर (MCLR) ८.८० टक्के आहे.

कर्जदारांची झोप उडणार! SBI सह बँकांचा ग्राहकांना ‘जोर का झटका’, व्याजदरांत पुन्हा मोठी वाढ
बँक ऑफ बडोदाचा RLLR ८.४५ टक्क्यांपर्यंत वाढला
सरकारी बँक, बँक ऑफ बडोदाचा RLLR देखील अर्धा टक्क्यांनी वाढून ८.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. RLLR हा रेपो लिंक्ड रेट आहे. बँक ऑफ इंडियाचा RBLR पूर्वी ८.२५ टक्क्यांवरून आता ८.७५ टक्के झाला आहे. तसेच मूळ दरात ०.२० टक्क्यांनी वाढ केली आहे, जी आता ९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • खाजगी क्षेत्रातील येस बँकेचा मूळ दर म्हणजेच MCLR सध्या ९.२५ टक्के आहे, जो पूर्वी ८.७५ टक्के होता.
  • दुसरीकडे कोटक बँक, डीसीबी बँक आणि इंडियन बँक यासारख्या काही बँकांनी एफडी दरांमध्ये किंचित वाढ केली, जी आता ६ टक्क्यांच्या वर पोहोचली आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here