नवी दिल्लीः राजस्थानमध्ये अशोक गहलोत सरकारवरील संकट अधिक गडद होत आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट ( ) हे दिल्लीत असून ते भाजपच्या ( BJP) संपर्कात आहेत, असं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय. दुसरीकडे काँग्रेसच्या ३० आणि काही अपक्ष आमदारांचा सचिन पायलट यांना पाठिंबा असल्याचं वृत्त सूत्रांच्या माहितीवरून एएनआयने दिलं आहे. राजस्थानमधील या सत्तासंघर्षा दरम्यान सचिन पायलट यांचे जुने मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी () ट्विट केलंय. त्यांनी काँग्रेस आणि अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्योतिरादित्य यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाहून खूप वाईट वाटतंय. काँग्रेसमध्ये क्षमता आणि प्रतिभेवर विश्वास दाखवला जात नाही, हेच यावरून स्पष्ट होतं, असं ट्विट ज्योतिरादित्य यांनी केलंय.

आधी राजस्थानमधील अशोक गहलोत सरकार पाडावं, असं सचिन पायलट यांना भाजपकडून कळवण्यात आल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय. पण भाजपने त्यांना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला आहे. कारण राज्यातील नेतृत्वावरून भाजपमध्ये खल सुरू आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थनात ४५ आमदार आहेत. तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली असून सर्व मुद्दे पटवण्यात आल्याचं बोललं जातंय.

आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी चौकशीसाठी सचिन पायलट यांना नोटीस बजावल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहेत. तर आपण भाजपमध्ये जाणार नाही. पण नवीन पक्ष नक्कीच स्थापन करू शकतो, असे संकेत सचिन पायलट यांच्याकडून देण्यात आले आहेत. चौकशीची नोटीस बजावल्याने सचिन पायलट हे नाराज आहेत.

लॉकडाउनपूर्वी सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी खूप चर्चा करत होते, असे मीडिया रिपोर्टस आहेत. भाजपनेही राज्यसभा निवडणुकीवेळी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नाही. सध्याच्या परिस्थिती पाहता सचिन पायलट पूर्णपणे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here