आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कशासाठी केला आहे, याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे.
लग्नाचा ११ वा वाढदिवस, उमेश कामत-प्रिया बापट झाले रोमँटिक, ही पोस्ट नक्की वाचा!
रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये. अशी ही बनवाबनवी सिनेमातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लूकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

रुपालीनं ही पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की या लूकमुळे तिला लहानपणीचे दिवस आठवलेत. रुपालीनं याचं श्रेय तिच्या हेअर ड्रेसर्सना दिलं आहे. ती म्हणते, अगोदर एवढे केस कापायला त्या तयार नव्हत्या. पण मन घट्ट करून त्यांनी हे केलं. पुढे ती असंही म्हणते की माझा लूक बदलायची वेळ येते, तेव्हा माझ्या हेअर ड्रेसर्स महत्त्वाची भूमिका निभावतात.
सिमी गरेवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं केलं कौतुक, म्हणाल्या-
या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसेल. रविवार १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर हा कार्यक्रम होणार आहे.
ऋचा आणि अलीचा ‘रिसेप्शन लूक’, मल्टीकलर ड्रेसनं वेधलं साऱ्यांचं लक्ष