Navratri devi Utsav | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली उपस्थिती लावून मंडळाला भेट द्यावी आणि आपल्या मंडळातील देवीचे दर्शन घ्यावे अशी मागणी मंडळाकडून करण्यात आली होती. यासाठी नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देखील देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचा गाडा हकण्यात आणि दसरा मेळाव्यात व्यस्त असल्याने या मंडळाला भेट देऊ शकले नाहीत.

 

Thane Devi Pandal
ठाण्यातील देवी मंडळाची आडमुठी भूमिका

हायलाइट्स:

  • मंडळाची आडमुठी भूमिका
  • मुख्यमंत्री न आल्याने विजयादशमीला देवीचे विसर्जनच केले नाही
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवीच्या दर्शनाला आले नाही म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्क देवीचे विसर्जन केलं नसल्याची घटना ठाण्यातील कळवा येथील विटावा परिसरात घडली आहे. आपल्या मंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट देऊन दर्शन घेत नाहीत तो पर्यंत देवीच विसर्जन करणार नाही असा अट्टाहास या मंडळाकडून करण्यात आला आहे.
Navratri 2022 : मुंबईतील ‘या’ देवीचे कधीच नाही होत विसर्जन, असे आहे डोळ्यांचे वैशिष्ट्य
ठाण्यातील कळवा – विटावा येथील सूर्यनगर भागातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देवीच आगमन मोठ्या थाटामटात करण्यात आल. यावेळी देवीची नऊ दिवस मनोभावी पूजा देखील या मंडळाकडून करण्यात आली. सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे तळागाळात नागरिकांची आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेत आहेत. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली उपस्थिती लावून मंडळाला भेट द्यावी आणि आपल्या मंडळातील देवीचे दर्शन घ्यावे अशी मागणी मंडळाकडून करण्यात आली होती. यासाठी नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देखील देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचा गाडा हकण्यात आणि दसरा मेळाव्यात व्यस्त असल्याने या मंडळाला भेट देऊ शकले नाहीत.
speeding car rams into durga procession : ​विसर्जन मिरवणुकीत भारधाव रिवर्स कार घुसली, अनेक जण जखमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आपल्या मंडळात येऊन भेट द्यावी आणि आपल्या मंडळातील देवीचे दर्शन घ्यावं असा अट्टाहास असलेल्या या मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मंडळातील देवीच्या दर्शनासाठी आले नसल्याने आपल्या मंडळाच्या देवीचे विसर्जनच केले नाही. जो पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मंडळातील देवीच्या दर्शनासाठी येणार नाही तोपर्यंत आम्ही देवीचे विसर्जन करणार नाही, अशी भूमिका नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट मंडळाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या देवीच्या दर्शनाला कधी जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here