Authored by Priyanka Vartak | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 6, 2022, 3:20 PM

7th Pay Commission: दसरा, दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आणि महागाई भत्त्यात चार टक्के वाढ जाहीर केली. या नंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. येत्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चार भत्त्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 

7th Pay Commission

हायलाइट्स:

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिसूचना जारी
  • कर्मचाऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांची थकबाकी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३४ वरून ३८ टक्के झाला आहे
नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांवर मेहरबान असून पुन्हा एकदा त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्के वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डीए ३४ वरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी चार भत्त्यांमध्ये वाढीचा लाभ मिळू शकतो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी; सरकारकडून अधिसूचना जारी, जाणून घ्या DA चे पैसे कधी मिळणार
सातव्या वेतन आयोगानुसार ३८ टक्के महागाई भत्ता मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीही आपोआप वाढतील. केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची देखील खात्री आहे. इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची डबल दिवाळी; DA नंतर आणखी एक भत्ता वाढणार
सरकारची घोषणा

२८ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३४ वरून ३८ टक्के इतका वाढला. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता ३८ टक्के दराने महागाई भत्ता आणि महागाई सुटका (Dearness Relief) मिळेल. केंद्र सरकारच्या या घोषणेचा थेट फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.

मोठी बातमी! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला
दुसरीकडे, १८ महिन्यांच्या थकबाकीसाठी केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव वाढवला आहे. पगार आणि भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून तो थांबवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा सरकारवर दबाव आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबतही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here