रावण दहन करण्याला आदिवासींनी विरोध केला. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि तणाव निवळला. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरीमध्ये ही घटना घडली होती.

 

chandrapur news today

रावण दहनाचा कार्यक्रम आदिवासी बांधवानी उधळला; म्हणाले, रावण आमच्यासाठी पूजनीय…

चंद्रपूर : रावण हा आदिवासींचा पूजनीय महात्मा असल्याने त्याचे दहन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत गोंडपिंपरी येथे रावण दहनाचा कार्यक्रम आदिवासी बांधवांनी उधळून लावला. विजयादशमीनिमित्त परंपरा म्हणून दसऱ्याला सर्वत्र रावण दहन केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथेही रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

गोंडपिंपरीमध्ये रावणाची दशमुखी प्रतिमा उभी करण्यात आली. मात्र या प्रतिमेचे दहन करण्यापूर्वीच आदिवासी बांधवांनी कार्यक्रम ठिकाणी येत दहनाचा विधी उधळून लावला. रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून त्याच्या प्रतिमेचे दहन केले जात असले तरी, रावण हा आदिवासी समाजासाठी पूजनीय आहे. तो श्रेष्ठ एक शिवभक्त आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिमेचे दहन करू नये, अशी भूमिका अलिकडे सर्वत्र घेतली जात आहे. दरम्यान, गोंडपिंपरी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

रावणाची मूर्ती समजून मारत होते दगड, पण मूर्तीचे गूढ रहस्य समोर येताच गावकऱ्यांनी जोडले हात

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here