नवी दिल्ली : आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँका आणि सर्व वित्तीय संस्थांकडून कर्जाची सुविधा दिली जाते. परंतु जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर काही नियम देखील आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करण्यासाठी जी तारीख निश्चित केली आहे, त्या तारखेला तुम्हाला हप्ता भरावा लागेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केल्यास उशिरा पैसे भरल्यास दंड भरावा लागेल. एवढेच नाही तर हप्ता भरण्यास उशीर होण्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो.

सणासुदीत खिसा रिकामा होणार! आठवडाभरात १० बँकांचे कर्ज फेडणे महागले; दरवाढीचा ग्राहकांना झटका
खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळणे कठीण होते. परंतु अनेकवेळा नोकरदारांना काही वेळा उद्भवणारी अडचण म्हणजे त्यांचा पगार त्यांच्या हप्त्यासाठी बँकेने निश्चित केलेल्या तारखेपर्यंत मिळत नाही. अशा परिस्थितीत कर्जाचा हप्ता भरण्यास विलंब होतो. तुम्हालाही अशी अडचण उद्भवल्यास आम्ही तुम्हाला अशा पर्यायाबद्दल सांगत आहोत, जो निवडल्यानंतर तुमची ही अडचण देखील दूर होईल आणि तुमची उशीरा पेमेंट शुल्क आणि डिफॉल्टपासूनही वाचता येईल.

हप्ता दोन प्रकारे भरता येतो
हप्ता (EMI) भरण्याचे दोन मार्ग आहेत. आगाऊ हप्ता (EMI in Advance) आणि थकबाकी हप्ता ( EMI in Arrears). परंतु बहुतेक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नसते. कर्ज घेतल्यानंतर, बँकेने हप्त्याची परतफेड करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केली तरी, ग्राहकांना वाटते की त्या तारखेला हप्ता भरावा लागेल. परंतू ग्राहक याबाबत बँकेशी बहुतांशवेळा सविस्तर चर्चा करीत नाहीत. त्यामुळे त्यांना हप्ता भरण्यास अडचण येते.

SBI ग्राहकांना पुन्हा झटका! ३० लाखांच्या गृहकर्जासाठी आता किती हप्ता भरावा लागणार, समजून घ्या
आगाऊ हप्ता (Advance EMI) म्हणजे काय?
कर्जाच्या हप्त्याची तारीख सहसा महिन्याच्या सुरुवातीला असते. यासाठी मुख्यतः महिन्याच्या पहिल्या आठवड्याची तारीख निवडली जाते. याला आगाऊ हप्ता म्हणतात. बहुतेक कर्जदारांना आगाऊ हप्त्याचा पर्याय दिला जातो.

ऑक्टोबरपासून EMI चं ओझं वाढणार! मुख्य पॉलिसी दर तीन वर्षांच्या उच्चांकावर
थकबाकी हप्ता समजून घ्या (EMI in Arrears)
जर तुमचा पगार उशीरा झाला असेल किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे तुम्हाला हप्ता भरण्यास उशीर होणार असेल, तर तुम्ही थकबाकी हप्त्याचा पर्याय निवडू शकता. थकबाकी हप्त्यामध्ये, तुम्ही महिन्याच्या शेवटी तुमचा हप्ता भरता. जरी तुम्ही आगाऊ हप्त्याचा पर्याय निवडला असला तरी हा पर्याय तुम्हाला निवडता येतो.

यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि व्यवस्थापकांची भेट घ्यावी लागेल. व्यवस्थापकांना तुमची अडचण सांगा आणि त्यांना विनंती करा की तुम्हाला EMI in Arrears द्वारे हप्ता भरण्याचा पर्याय द्या. यामुळे तुमची अडचण सहज दूर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here