Authored by Priyanka Vartak | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 6, 2022, 5:06 PM

Adani Green Energy Shares: अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा समभाग गुरुवारी सकाळी १०:२० वाजता (IST) ४.०६ टक्क्यांनी वाढून २२१९.२ रुपयांवर गेला, तर बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स ४४३.१६ अंकांनी ५८५०८.६३ वर पोहोचला.

 

Adani Green Shares

हायलाइट्स:

  • अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली
  • गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार सकारात्मक चिन्हात उघडला.
  • इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्स ३.१९% वाढून रु. २,२०३ वर ट्रेड करत होते.
मुंबई : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार सकारात्मक चिन्हात उघडला. यादरम्यान गेल्या काही दिवसातील चढ-उताराचा धक्का सहन करणाऱ्या अदानी समूहाला काहीसा दिलासा मिळाला. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारात ४ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्स ३.१९% वाढून रु. २,२०३ वर ट्रेड करत होते.

मंदीच्या छायेत कमाईची संधी! IT दिग्गज कंपन्या देणार १००% परतावा, गुंतवणुकीची हीच योग्य वेळ
गेल्या चार दिवसांपासून हा शेअर तेजीत आहे. खरं तर अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक मोठे कारण आहे आणि ते म्हणजे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील फर्म ग्रीन बॉण्ड्सद्वारे सुमारे १०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग बीएसईवर २,१३२.६५ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ४.५२ टक्क्यांनी वाढून २,२२९.१ रुपयांवर पोहोचला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ५-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर व्यापार करत आहे पण २०-दिवस आणि ५०-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी आहे. एका वर्षात स्टॉकने तब्बल ८२.५४ टक्के आणि २०२२ मध्ये ६७ टक्के वाढ नोंदवली आहे.

यंदा साजरी करा तगड्या परताव्याची दिवाळी, ‘या’ शेअर्सवर मिळेल बंपर रिटर्न!
कंपनीचे मार्केट कॅप ३.५८ लाख कोटी रुपये

कंपनीचे मार्केट कॅप ३.५८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. कंपनीच्या स्टॉकने १९ एप्रिल २०२२ रोजी ३०४८ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला तर २०२१ मध्ये ११०६ रुपयांचा ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला होता. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर आजच्या २,२२९ रुपयांच्या उच्चांकासह ११.२३ टक्क्यांनी वाढला आहे.

बोनस शेअर्समधून कमाईची संधी! ‘ही’ कंपनी दोन शेअर्सवर देणार १ बोनस शेअर
कंपनीची योजना काय
२९ सप्टेंबर रोजी अदानी समूहाच्या फर्मने राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ६०० मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा पवन-सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केल्याचे सांगितले होते. याच सत्रात शेअर २,००४.५० रुपयांवर बंद झाला होता. अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग ३० सप्टेंबर रोजी २० टक्क्यांनी वाढून २,४०५ रुपयांवर पोहोचला. जैसलमेर येथील प्लांटचा सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत २५ वर्षांसाठी २.६९/kwh दराने वीज खरेदी करार आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here