जुन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाती नोंद झाली आहे. मात्र, जुलै महिन्यांच्या सुरुवातीपासूनच कोकणात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात कोकण आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
सोमवारी दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात मंगळवारपासून पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. मंगळवार आणि बुधवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात किनारपट्टीसह राज्यभरात मान्सून सक्रीय होणे, दक्षिण गुजरातमधील चक्रवाती वर्तुळाकार स्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीदेखील झाली. त्यानंतर गेल्या तीन दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले होते.
दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पावसाचं पाणी शेतात शिरलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times