एक महिन्यांपूर्वी पंकज त्रिपाठी गावी आले होते. त्यांनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केलं होतं. झाडं किती मोठी झाली, ते पाहायला ते आले होते.
बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची उडवली जातेय खिल्ली, भन्नाट Memes एकदा पाहाच
निसर्गात घेतायत आनंद
पंकज त्रिपाठी गावाला आलेत. ते म्हणाले, इथली शांतता आणि स्नेह पाहून आनंद मिळतो. ते गावात फिरून लावलेली झाडं पाहतायत. स्वत: लावलेली झाडं पाहून त्यांना आनंद मिळतो.

पंकजचं बालपण गरिबीत गेलं
पंकज म्हणाले, ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारमध्ये एका खेडेगावात माझा जन्म झालाय. त्यावेळी घरात पैसे नसायचे. गावात कुणाकडे टीव्ही पण नव्हता. पैशाचं महत्त्व समजतच मी मोठा झालो. तुम्हाला आनंदी जगण्यासाठी प्रचंड पैसा लागत नाही. माझ्याकडे जे आहे, त्यात मी खूश आहे.’
पंकज त्रिपाठी यांनी गोपालगंजजवळ बेलसंड गावात वृक्षारोपण केलं. या पर्यावरण अभियानाबद्दल बोलताना ते म्हणाले होते, ‘ ही खूप जुनी योजना आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहे. आपण जिथे उभे आहोत, तिथून एक किलोमीटर कुठलंच झाड नाही. हिरवळ नाही. म्हणूनच इथे झाडं लावणं गरजेचं आहे.’
आईची लाडकी सून अनघा अंकुश चौधरीबरोबर गेलीय पसरणी गावात, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का
‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये सांगितला स्वत:चा संघर्ष
गेल्या वर्षी पंकज त्रिपाठी KBC मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी केलेला स्ट्रगल सांगितला. २००४ मध्ये ते मुंबईत आले. ८ वर्ष घरी बसून होते. त्यांची बायकोच घर चालवत होती. ८ वर्ष कोणालाच माहीत नव्हतं, ते काय करत आहे ते.
हृतिक आणि सैफचा विक्रम वेधा पाहून काय म्हणाले प्रेक्षक?