जुन्नर(पुणे): राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. नुकताच दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर चांगली आगपाखड केली. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. मात्र, सध्यातरी ती गोष्ट अशक्यप्राय अशीच आहे. मात्र, जुन्नर तालुक्यात शिंदे आणि ठाकरे यांची दिलजमाई झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

जुन्नर तालुक्यातील एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात शिंदे आणि ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या पत्रिकेचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

पाहा ही लग्न पत्रिका –

Junnar News

जुन्नरमध्ये शिंदे -ठाकरेंची दिलजमाई… सोशल मीडियावर चर्चांना उधाण

जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या अनुराधा यांचा शुभविवाह ८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.

त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात ही लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत असून चांगलीच करमणूक होत आहे एवढं मात्र नक्की. या दिलजमाईमुळे नागरिकांचे मात्र चांगले मनोरंजन होत आहे.

माझ्या आई-वडिलांची शपथ, भाजपने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं होतं उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here