नाशिक : दसऱ्या मेळाव्यासाठी मुंबईला जाताना काल शहापूर येथे महिला शिवसैनिकांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आज शिवसेनेच्या सदर महिला कार्यकर्त्यांचा शहरातील शालिमार येथील पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते सुनील बागुल यांच्या हस्ते भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
आम्ही बाळासाहेबांच्या निष्ठावान शिवसैनिक असल्याचे शिंदे गटातील कार्यकर्त्यांना दाखवून दिले, अशी भावना या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेना उपनेते सुनिल बागुल यांनी महिला शिवसैनिकांचे कौतुक करत या महिलांनी चांगले काम केल्याचं म्हटलं आहे.