बालाजी रथ हा ट्रॅक्टरला जोडून या ट्रॅक्टरची स्टेअरिंग मंत्री गिरीश महाजनांनी हातात घेतले. यावेळी ट्रॅक्टरवर भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्यासमवेत उद्धव ठाकरे गटाचे निलेश चौधरी हे बसलेले होते. महाजन हे बालाजी रथ असलेला ट्रॅक्टर चालवताना दिसून आले. या बालाजी रथोत्सवाच्या निमित्ताने पक्षभेद, मतभेद विसरून उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचे कार्यकर्ते तसंच भाजपचे पदाधिकारी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
bjp and shivsena, उद्धव ठाकरे समर्थक, शिंदे गटाचे कार्यकर्ते अन् भाजपचे मंत्री आले एकत्र; जळगावात नेमकं काय घडलं? – uddhav thackeray shivsena supporters shinde group and bjp minister girish mahajan came together
जळगाव : राज्यात सद्यस्थितीत शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमली यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वाचे विचार नेमके कोणाचे यावरुन भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे. असं असताना जळगावात मात्र उद्धव ठाकरे गट, शिंदे गट व भाजपचे नेते एकत्र आल्याचे दिसून आले. निमित्त होते बालाजी रथाचे. एकीकडे राज्यात राजकीय संघर्ष सुरू असतानाच जळगावमध्ये तिन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.