या चारही कफ सिरपची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. या सिरप्समध्ये डायथायलिन ग्लाइकॉल (diethylene glycol) आणि एथिलीन ग्लायकॉल (ethylene glycol) यांचं प्रमाण अधिक आढळून आलं, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडून जोपर्यंत या कफ सिरपचं विश्लेषण होत नाही, तोपर्यंत या चारही कफ सिरपच्या उत्पादनांच्या सर्व बॅचेस असुरक्षित मानल्या जातील, असं संघटनेनं म्हटलं आहे.
गाम्बियातील मुलांच्या मृत्यूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं २९ सप्टेंबरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला दिली होती. मेडन कंपनीच्या ४ सिरपमध्ये डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्याचं तपासणीत आढळून आलं. या दोन्ही घटकांचं अधिक प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण त्यामुळे अनेक साईड इफेक्ट्स होतात. डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलच्या अधिकच्या मात्रेमुळे किडनीची समस्या, पोटदुखी, उल्टी, अतिसार, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
cough syrup, कितीही खोकला झाला तरी ‘या’ ४ कफ सिरपचा वापर टाळा; ६६ मुलांच्या मृत्यूनंतर WHOच्या सूचना – after death 66 children in gambia who warns against 4 indian cough syrups
मुंबई: पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. कफ सिरप प्यायल्यानं या मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात तयार झालेल्या चार कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. भारतीय कंपनीनं तयार केलेल्या चार कफ सिरपचा वापर तातडीनं थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.