नवी दिल्ली: इन्स्टाग्रामवरील भांडण टोकाला गेल्यानं दोन जण जीवाला मुकले आहेत. एक तरुण आणि एक तरुणी यांच्यात लाईक्स, फॉलोअर्सवरून सुरू झालेला वाद वाढत गेला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचं रुपांतर अखेर दुहेरी हत्येत झालं. हत्या करणारे दोन आरोप अल्पवयीन आहेत.

उत्तर दिल्लीतील भलस्वा डेअरी परिसरात दोन तरुणांची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. परिसरात वास्तव्यास असलेल्या तरुणीचा एका तरुणाशी वाद होता. इन्स्टााग्रामवर कोणाचे फॉलोअर्स, लाईक्स अधिक यावरून वादाला सुरुवात झाली. तू माझ्या गल्लीत येऊन दाखव, असं आव्हान तरुणीनं दिलं.
वर्षभरापूर्वी ICICIमध्ये रुजू झाला; प्लान रचला, १२ कोटी पळवले; लूक बदलला, २ महिन्यांनंतर…
गाझियाबादच्या अर्थला येथे वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय निखिलनं आव्हान स्वीकारलं. आपल्या १८ वर्षांच्या मित्राला (साहिल) घेऊन निखिल पोहोचला. तिथे मुलीचा भाऊ आणि दोन-तीन इन्स्टाग्राम फॉलोअर्स आधीपासूनच हजर होते. त्यांनी निखिल आणि साहिलची चाकू भोसकून हत्या केली. हत्येनंतर अल्पवयीन आरोपी फरार झाले. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेतील दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

निखिल आझादपूर बाजारपेठेत टेम्पो चालक म्हणून काम करायचा. तर साहिल त्याच मंडईत कामगार होता. निखिल आणि त्याचे आई-वडील आधी मुकुंदपूर-२ मध्ये वास्तव्यास होते. काही महिन्यांपूर्वीच ते गाझियाबादच्या अर्थलामध्ये स्थायिक झाले. निखिलचे काक मुकुंदपूरमध्येच राहतात. त्यामुळे निखिलचं तिथे येणं जाणं असायचं. तर साहिल गल्ली क्रमांक १४ मध्ये राहायचा.
रामानं जसा रावणाचा वध केला, तसाच मी माझ्या मेहुण्यांना संपवणार! FBवर दिली धमकी अन् मग…
नेमका वाद काय?
निखिलचं इन्स्टाग्रामवर ‘गाझियाबाद’ नावानं अकाऊंट होतं. त्याच्या आसपास राहणारे लोक त्याला गाझियाबाद नावानंच हाक मारायचे. आरोपी मुलगीदेखील इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. दोघांचे फॉलोअर्स एकाच परिसरात राहणारे होते. दोघांमध्ये जास्तीत जास्त फॉलोअर्स मिळवण्याची स्पर्धा सुरू होती.

तू गल्लीत येऊन दाखव!
इन्स्टाग्रामच्या लाईक्स, फॉलोअर्सवरून सुरू झालेला वाद हळूहळू टोकाला गेला. तू मला काय समजतोस? हिंमत असेल तर गल्लीत येऊन दाखव, असं आव्हान मुलीनं निखिलला दिलं. त्यावर मीदेखील गाझियाबादचा आहे. येऊन दाखवतो, असं उत्तर निखिलनं दिलं. निखिल साहिलला घेऊन बुधवारी रात्री पंजाबी बागेत पोहोचला. तिथे मुलीनं आधीच तिचा भाऊ आणि अन्य मुलांना पाठवलं होतं. त्यांनी निखिल आणि साहिलला चाकूनं भोसकलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here