५ ऑक्टोबरला श्रीमंत शंकरदेव यांची जयंती होती. श्रीमंत शंकरदेव १५-१६ व्या शतकातील विद्वान होते. त्याच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तेजस्विता कला सादर करत होती. तितक्यात ती अचानक मंचावर कोसळली. तिला तातडीनं माजुलीच्या गोर्मुर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन तासांनंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तेजस्विताचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. रुग्णालयात ऑक्सिजन नव्हता. त्यामुळेच तेजस्विताचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला. तेजस्विता दुपारी पावणेतीनच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आलं. दोन तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. तिला लहानपणापासून हृदयाशी संबंधित आजार होते. तिनं औषधांचा डोस पूर्ण घेतला नव्हता, असं डॉक्टरांनी सांगितलं.
ऑक्सिजनच्या अनुपलब्धतेमुळे तेजस्विताचा मृत्यू झाल्याचा आरोप माहुली जिल्हायुक्त पुलक महंत यांनी फेटाळून लावला. ‘मुलीला याआधीही अशा प्रकारचा त्रास झाला होता. तिला आवश्यक असणारा ऑक्सिजन देण्यात आला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा होता,’ असं महंत यांनी सांगितलं. तेजस्विताच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागानं माजुली जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक अमूल्य गोस्वामींना निलंबित केलं आहे.