मुंबई : आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला मिडकॅप, बँका आणि आयटीच्या घसरणीने मार्केट खाली खेचला आहे. धातू समभागांवरही आज दबाव आहे. निफ्टी १७,३०० च्या खाली उघडला आहे आणि आज ऑटो समभागातील हेवीवेट देखील कमजोरीसह व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स १८६ अंकांनी घसरून ५८०३६ वर तर, निफ्टी ५२ अंकांनी घसरून १७२७९ च्या पातळीवर होता. टायटनने सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी टॉप गेनरमध्ये ४.४२ टक्क्यांची उसळी घेतली आहे. याशिवाय हिरो मोटर्स, मारुती, एचसीएल टेक आणि एसबीआय लाईफ या कंपन्यांनाही तेजीत दिसत आहेत. हिंदाल्को, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक सर्वाधिक घसरले.

मंदीच्या छायेत कमाईची संधी! IT दिग्गज कंपन्या देणार १००% परतावा, गुंतवणुकीची हीच योग्य वेळ
बाजाराची सुरुवात
आज बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे आणि एनएसईचा निफ्टी ४४.६० अंकांनी किंवा ०.२६ टक्क्यांच्या घसरणीसह १७,२८७.२० वर उघडला आहे. त्याचवेळी, बीएसई सेन्सेक्स १२९.५४ अंकांनी किंवा ०.२२ टक्क्यांनी घसरून ५८,०९२.५६ वर उघडला.

रुपयात विक्रमी घसरण सुरूच
आज रुपयाची घसरणही आणखी खोल झाली असून रुपया ३२ पैशांच्या घसरणीसह ८२.२० रुपये प्रति डॉलरवर उघडला आहे. रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला आहे. रुपयाने प्रथमच प्रति डॉलर ८२ रुपये पार केले आहेत.

यंदा साजरी करा तगड्या परताव्याची दिवाळी, ‘या’ शेअर्सवर मिळेल बंपर रिटर्न!
सेन्सेक्स आणि निफ्टीचे शेअर्स
सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ८ समभाग वाढीसह आणि २२ समभाग घसरणीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत. त्याचवेळी, निफ्टीच्या ५० समभागांपैकी १५ समभागांमध्ये वाढ आणि ३५ समभागात घसरण झाली. रिलायन्स सेन्सेक्स शेअर्समध्ये सावरण्याच्या प्रयत्न करत आहे आणि सध्या ०.२५ टक्के वर आहे.

हुश्श! अदानींचा शेअर तेजीत; गुंतवणूकदार सुखावले, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या आवश्यक माहिती
कोणत्या शेअर्समध्ये तेजी
आज टायटन सेन्सेक्समध्ये टॉप गेनर आहे आणि ५.११ टक्के वरच्या पातळीवर कायम आहे. याशिवाय मारुती, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, एल अँड टी, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये हिरव्या चिन्हात व्यापार होताना दिसत आहे.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्समध्ये आज घसरणाऱ्या शेअर्समध्ये एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, डॉ रेड्डीज लॅब्स, एम अँड एम, एनटीपीसी, सन फार्मा, अॅक्सिस बँक, टीसीएस, एचयूएल, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड, बजाज फायनान्स, इन्फोसिस, HDFC बँक,आयटीसी, एसबीआय, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकसह आयसीआयसीआय बँक देखील कमजोरीसह व्यवहार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here