वॉशिंग्टन डी.सी: आगामी काळात जगभरातील आर्थिक स्थिती बिकट होणार आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडण्याची चिन्हे दिसत असल्याची भीती आयएमएफने व्यक्त केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार रशिया-युक्रेनमधील संकटामुळे परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. तसेच करोना संसर्गाच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्था आता जगभरातील युद्धानंतर बदललेल्या परिस्थितीचे बळी ठरत आहेत. यासह IMF ने पुन्हा एकदा पुढील वर्षासाठी जगभरातील आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. संस्थेने यापूर्वी ३ वेळा हा अंदाज कमी केला आहे. IMF ने मंदीच्या धोक्याबद्दल चेतावणी दिली आणि आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आवाहन केले.

रशिया यूक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम, जागतिक बँकेकडून विकास दराबाबत मोठं भाकित
४ ट्रिलियन डॉलरचे नुकसान
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज पुन्हा एकदा कमी करत म्हटले की २०२६ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ४० ट्रिलियन डॉलरपर्यंत कमी होऊ शकते. ही रक्कम भारतीय रुपयात सुमारे ३२५ लाख कोटी रुपये इतकी आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी गुरुवारी जॉर्जटाउन विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना जागतिक आर्थिक वाढ मंदावण्याची भीती व्यक्त केली.

जागतिक मंदीबाबत आले मोठे अपडेट; थेट अमेरिकेतून आला सावधानतेचा इशारा
त्यांनी म्हटले की गोष्टी चांगल्या होण्याआधीच बिघडण्याची शक्यता अधिक दिसते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत आयएमएफच्या दृष्टिकोनावर नाट्यमयरित्या परिणाम झाल्याचे जॉर्जिव्हा यांनी सांगितले. या युद्धाचे मोठे परिणाम जगातील अनेक देशांमध्ये दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या कंपन्यांमध्ये ३२ हजारहून कर्मचार्‍यांच्या गेल्या नोकऱ्या
चौथ्यांदा वाढीचा अंदाज कमी
सध्याच्या संकेतानुसार आयएमएफने जगाच्या आर्थिक दरवाढीचा अंदाज कमी केला आहे. जॉर्जिव्हाने म्हणाले की IMF ने आधीच जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज तीन वेळा कमी केला आहे. आता ते २०२२ मध्ये ३.२ टक्के आणि २०२३ मध्ये २.९ टक्के करण्यात आल्याचे दिसत आहे. आयएमएफचे प्रमुख म्हणाले जागतिक पातळीवर मंदीशी संबंधित धोके वाढत आहेत. यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेचा एकतृतीयांश वाटा असलेल्या देशांमध्ये किमान सलग दोन तिमाही आर्थिक घसरणीची परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

म्हणजेच या देशांमध्ये मंदीचा स्पष्ट धोका आहे. जॉर्जिव्हाचा हा अंदाज तेल निर्यात करणाऱ्या देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक दिवस आला आहे. आधीच उच्च महागाईशी झुंज देत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेवर तेल उत्पादनात घट झाल्यामुळे आणखी दबाव येण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here