रेकॉर्ड डेट
स्मॉल कॅप कंपनी ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस ऑर्डर (Gretex Corporate Services Order) आपल्या गुंतवणूकदारांना बंपर बोनस शेअर्स (Bonus Share) देणार आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ८:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ८ बोनस शेअर्स देईल. कंपनीने बोनस शेअर्स मिळण्यास पात्र होण्यासाठी रेकॉर्ड डेट १३ ऑक्टोबर २०२२ ठेवली आहे. कंपनी १०चे दर्शनी मूल्य असलेले ९,०९,८७,६०० रुपयांचे एकूण ९०,९८,७६० शेअर्सचे वाटप करणार आहे.
५२ आठवड्यांचा उच्चांक
एक वर्षापूर्वी Gretex कॉर्पोरेट सर्व्हिसेसने आयपीओ लॉन्च केला होता. कंपनीचे शेअर्स ९ ऑगस्ट २०२१ रोजी BSE SME वर सूचीबद्ध झाले. कंपनीचे मार्केट कॅप ६५.१७ कोटी रुपये आहे. ग्रेटेक्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६०७ रुपये आहे. तर नीचांकी भाव १६० रुपये आहे. गेल्या ५ दिवसांत शेअर्सच्या भावात १०.१९ टक्के वाढ झाली आहे. तर एका महिन्यात शेअर्स ७४.०८ टक्क्यांनी वाढला आहे. या शेअर्सने ६ महिन्यांत २२२.८२ टक्के आणि २०२२ मध्ये आतापर्यंत १७७.०८ टक्के परतावा दिला आहे.
यामुळे बोनस शेअर्सचे वाटप
साधारणपणे जेव्हा कंपन्यांकडे रोख रकमेची कमतरता असते आणि भागधारकांना नियमित उत्पन्नाची अपेक्षा असते तेव्हा शेअरधारकांना बोनस शेअर्स दिले जातात. शेअरधारक बोनस शेअर्स विकू शकतात आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. कंपनीच्या राखीव निधीची पुनर्रचना करण्यासाठी बोनस शेअर्स देखील जारी केले जाऊ शकतात. बोनस शेअर्समुळे कंपनीचे भागभांडवल वाढते परंतु निव्वळ मालमत्ता वाढत नाही.