मुंबई: मुंबईच्या चुनाभट्टी परिसरातील एका नाल्यात बुधवारी १६ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. १६ वर्षांच्या मुलीचे आपल्या पतीशी प्रेम संबंध असल्याचा संशय आरोपी महिलेपैकी एकीला होता. त्यामुळे तिनं दुसऱ्या महिलेच्या मदतीनं अल्पवयीन मुलीची हत्या केली.

नाल्यात मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील एका सीसीटीव्हीत दोन महिला रिक्षानं येत असल्याचं दिसलं. याच महिलांनी एक गोणी नाल्यात फेकली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. गोणी नाल्यात फेकून महिला तिथून निघून गेल्या. या दोन्ही महिलांचा शोध पोलिसांनी घेतला आणि त्यांना अटक केली.
असेल हिंमत तर ये गल्लीत! इन्स्टाग्रामवरचं भांडण टोकाला गेलं; दोन तरुणांसोबत आक्रित घडलं
अल्पवयीन मुलीचे आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय महिलेला होता. माझ्या पतीपासून लांब राहा, असं तिनं मुलीला सांगितलं होतं. मात्र तरीही मुलगी आपल्या पतीच्या संपर्कात असल्याचं महिलेला समजलं. याबद्दल बोलण्यासाठी महिलेनं मुलीला भेटायला बोलावलं. त्यावेळी महिलेनं गळा आवळून मुलीचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुसऱ्या महिलेनं मुख्य आरोपीला मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुलीचे हात-पाय बांधून तिचा मृतदेह गोणीत भरण्यासाठी दुसऱ्या महिलेनं मुख्य आरोपीला मदत केली. या प्रकरणी रिक्षा चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी ICICIमध्ये रुजू झाला; प्लान रचला, १२ कोटी पळवले; लूक बदलला, २ महिन्यांनंतर…
या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ‘या प्रकरणातील मृत मुलीनं सहा महिन्यांपूर्वी ५१ वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून आम्हाला मुलीचा जबाब नोंदवायचा होता. त्याचसाठी ती शहरात आली होती,’ असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here