जयपूरः राजस्थानमधील राजकारण सध्या ढवळून निघत आहे. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे बंडाच्या पवित्र्यात आहेत. विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे सचिन पायलट यांचे समर्थक आमदार आज रात्रीत आपला राजीनामा देतील, अशी दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन आहे. याशिवाय काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. ३० आमदारांपैकी किमान १२ ते १५ आमदार रात्रीत राजीनामा देऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

डॅमेज कंट्रोलमध्ये लागले माकन, रणदीप आणि अविनाश

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेय हे दिल्लीहून जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. तिन्ही नेते डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत त्यांची बैठक होतेय. राजस्थानमधील काँग्रेस सरकारला कुठलाही धोका नाही. पण सचिन पायलट यांच्याशी संपर्क झाला नाही, असं अविनाश पांडेय दिल्ली विमानतळावर म्हणाले होते. जयपूरमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्या म्हणणं बदललं होतं. भाजपने काँग्रेसवर आक्रमक केलं आहे. या संकटाच्या काळात चर्चेतून वाद सोडवावा लागणार आहे, असं पांडेय म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदेंना पायलट भेटले

राजकीय हालचाली सुरू असताना दिल्लीत सचिन पायलट आणणि ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट झाली. दोघांमध्ये किमान ३० मिनिटं चर्चा झाली. पण या भेटीला कुणीही दुजोरा दिलेला नाही. या भेटींनंतर शिंदे यांनी ट्विट केल्याचं सांगण्यात येतंय. राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत हे सचिन पायलट यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमध्ये क्षमता आणि हुशारीला कुठलंही महत्त्व नाही हे यावरून स्पष्ट होतं, असं शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि यांनी आमदारांसोबत बैठक घेतली. ही बैठक संपली. गहलोत यांच्या बहुमत आहे. आमचेही प्रयत्न सुरू आहेत. काही भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपचे आणखी आमदार आम्ही फोडू. यामुळे आमचा पराभव करणं अशक्य आहे, असं बैठकीनंतर काँग्रेस आमदार राजेंद्र गुड्डा यांनी सांगितलं.

पायलट यांचा गहलोत यांच्याविरोधात हल्लाबोल

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. पण उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. या निर्णयानंतर सचिन पायलट यांनीही ज्योतिरादित्य शिंदेप्रमाणे बंडाचे निशाण फडकवल्याचं सांगितलं जातंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here