Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 7, 2022, 10:55 AM
Jalgaon News : जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात काल सायंकाळपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांना पूर आला असून चाळीसगाव शहरातील पूल पाण्याखाली गेला आहे.

हायलाइट्स:
- चाळीसगाव तालुक्यात बेमोसमी पाऊस
- तितूर आणि डोंगरी नद्यांना पूर
- तालुक्यातील पूल पाण्याखाली
चाळीसगाव परिसरात काही भागात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून डोंगरी तितुर नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून शहरातील पूलावरून पाणी जात असल्याने वाहनांना जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. पूलावरुन पाणी वाहत असतांना याठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक सुरु असल्याचेही चित्र आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एकंदरीत पावसाळा संपलेला आहे, सप्टेंबर अखेर व ऑक्टोंबर महिन्यात हिवाळ्याला सुरुवात होते. मात्र, यातच मोठ्या प्रमाणावर बेमोसमी पाऊस पडल्याने त्याचा कापूस पिकांसह इतर रब्बींच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातही सर्वत्र ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी या बेमोसमी पावसाने हजेरी लावली असल्याचे चित्र आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.