यंदा दसऱ्याच्या दिवशी भारतीयांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक सोन्याची खरेदी केली आहे. सोन्याचा भाव ४९ हजार रुपयांच्या वर असतानाही हे चित्र समोर आले आहे. या संकेतांमुळे बाजाराच्या अपेक्षा आणखी वाढल्या असून येत्या दिवाळी आणि धनत्रयोदशीला व्यवसाय चांगला होईल असा विश्वास उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.
किती सोने विकले गेले
दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या २२ कॅरेट सोन्याच्या किमती ५०,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली घसरल्या आहेत आणि दसऱ्याच्या काळात ४९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास होत्या. दसऱ्याला सोन्याच्या दागिन्यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी जास्त झाली आहे. काही काळ बाजारपेठेतील दबावात असलेली मागणी आता सणासुदीच्या काळात बाजारात वाढताना दिसून येत असून त्यामुळे व्यवसाय वाढल्याचे समोर येत आहे.
त्याचवेळी, बाजारात गुंतवणुकीची मागणी वाढण्याची चिन्हे देखील आहेत कारण मोठ्या प्रमाणात खरेदीदार देखील सोन्याची नाणी खरेदी करत आहेत. यासोबतच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. अशा स्थितीत जगभरातील मंदीच्या भीतीने लोकांवर निश्चितच परिणाम होत असला तरी ते खरेदी थांबवत नसल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, ग्राहकांचा भर अशा खरेदीवर असतो, जो एकतर गुंतवणुकीच्या स्वरूपात असेल किंवा खिशात अनुकूल असेल.
पुढेही सोन्याच्या बाजारात हिरवळीचे संकेत
दरम्यान, बाजाराच्या अहवालानुसार सोन्याच्या विक्रीत यंदा आणखी वाढ अपेक्षित आहे. देशात सर्वाधिक सोन्याची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी होते, त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या संकेतांवरून यावर्षी धनत्रयोदशीला दिवशी विक्री उच्च राहण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरातही वाढ थांबण्यास चित्र सध्या दिसत नाही. सणासुदीच्या काळात मागणी वाढणे आणि परदेशी सिग्नल यांचा सध्या सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे सोन्या-चांदीत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोने ५३ हजाराच्या पातळीवर पोहोचू शकते तर दुसरीकडे, चांदी ६३,००० ते ६५,००० ची पातळी गाठू शकते. दुसरीकडे, भारतातील सुवर्ण बँकांनी शिपमेंट कमी केल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमतींमध्ये उसळी घेण्याची शक्यता आहे.