Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 7, 2022, 12:45 PM

Beed Crime News : अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील ग्रामपंचायत सदस्याची दसऱ्याच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी १७ जणांवर ॲट्रोसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Beed Crime News
क्षुल्लक कारणावरुन ग्रामपंचायत सदस्याला संपवलं; रेशन दुकानदारासोबत वादानंतर झाली भयानक घटना

हायलाइट्स:

  • किरकोळ कारणावरुन ग्रामपंचायत सदस्याची हत्या
  • पोलीस ठाण्याबाहेर महिलांचा ठिय्या आंदोलन
  • बीडमधील अंबाजोगाई येथील घटना
बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला. या वादाची कुरापत काढून दसऱ्याच्या सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्रॉसिटीसह हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी. या मागणीसाठी संतप्त महिलांनी शहर ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. अखेर अप्पर अधीक्षकांच्या आश्वासनानंतर महिलांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतलं. अंबाजोगाई शहरालगतचा चेन्नई हे गाव नेहमीच चर्चेत राहणार असल्याचे नेहमी पाहायला मिळतं. मात्र, रेशन दुकानदारासोबत झालेल्या या घटनेनंतर जवळपास गाव हे भीतीच्या वातावरणामध्ये आणि तणावामध्ये होतं. मात्र, त्यानंतर या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन संत गतीने काम करत असल्याचं गावकऱ्यांना लक्षात आले.

भारतात तयार झालेले ४ कफ सिरप कशामुळे धोकादायक? WHOनं सांगितलं नेमकं कारण
या सगळ्या आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन महिलांनी शहर पोलीस ठाणे गाठत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत पोलीस ठाण्याला घेराव घातला. मात्र, अप्पर अधीक्षकांच्या आश्वासनानंतर या महिलांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतलं. या आश्वासनानंतर सगळ्या आरोपींना आम्ही लवकरच ताब्यात घेऊ आणि त्या घडलेल्या गुन्ह्यातील व्यक्तीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन दिल्याने संतप्त झालेल्या महिला शांत झाल्या.

धनुष्यबाणासाठी ठाकरेंची टीम दिल्लीत धडकली; पोटनिवडणुकीपूर्वी सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here